Breaking News

शिवसंग्रामच्या पाटोदा शहराध्यक्षपदी शंकर घाडगे, तर सामाजिक न्याय तालुकाध्यक्षपदी लक्ष्मण अडागळेंची निवड


पक्षसंघटनेचा विस्तार अन वाढ संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांच्या सूचनेवरून करण्यात येणार - काकडे

पाटोदा : पाटोदा येथे शिवसंग्राम पक्षसंघटनेच्या वतीने विशेष कार्यकर्ता बैठक व पदग्रहण सोहळा काल शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या बैठकीत शंकर घाडगे यांची शिवसंग्राम पाटोदा शहराध्यक्ष पदी तर लक्ष्मण अडागळे यांची शिवसंग्राम सामाजिक न्यायविभागाच्या पाटोदा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात याली.
     पाटोदा तालुक्यात पक्षविस्तार, वाढ करण्याची जबाबदारी या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर जिल्हाध्यक्ष काकडे यांनी शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांच्या सूचनेवरून दिली. उर्वरित पदवाटप लवकरच करण्यात येईल असेही यावेळी काकडे यांनी सांगितले. बैठकीस जिल्हाध्यक्ष  सुधीर काकडे, बीड तालुकाध्यक्ष  नवनाथ प्रभाळे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, बीड पं.स.माजी सभापती ज्ञानेश्वर कोकाटे,विद्यार्थी आघाडीचे उप जिल्हाप्रमुख अक्षय माने, विद्यार्थी आघाडी पाटोदा तालुकाध्यक्ष सुशिल तांबे, सुनिल धायजे,  पवन अडागळे, तसेच शहरातील प्रमुख कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

No comments