Breaking News

शिक्षक संघाच्या बीड तालुका अध्यक्षपदी बंडू घोरड


बीड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे बीड तालुकास्तरिय त्रैवार्षिक अधिवेशन झूम अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन जिल्हाध्यक्ष भगवान पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाले. यामध्ये बीड तालुक्यातील जवळपास दोनशे शिक्षक संघाच्या सभासदांनी सहभाग नोंदवला.


महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे बीड तालुकास्तरिय त्रैवार्षिक अधिवेशन आज कोराना महामारीमुळे झूम अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन संपन्न झाले. या अधिवेशनात बीड तालुक्यातील शिक्षकांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली प्रामुख्याने शिक्षकांचे पगार, वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी, वैदयकिय परिपूर्ती बिले, शिक्षकांचे पगार cmp प्रणाली मार्फत करणे, GPF ऑनलाईन करणे या व इतर महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली, अधिवेशानामध्ये सर्वानूमते शिक्षक संघाचे एकनिष्ठ सभासद बंडू घोरड यांची बीड तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल बिभिषण पाटील, जिवन बागलाने , परमेश्वर शिंदे , बाळराजे तळेकर , पुष्पाताई लोमटे , कैलास दहातोंडे , रत्नाकर वाघमारे , बप्पासाहेब देवगुडे , दिनकर घोरड , बिभिषण हावळे, हिरालाल जाधव , रमाकांत कुर्ले , जिवन हाडुळे, संजय वागुले ,तुकाराम घोडके , निलेश चव्हाण, शिवाजी जगताप ,महादेव घोडके , अशोक भांगे , आनंद लाड , शिवाजी घरत, उमेश डोके ,दिगांबर देवकते ,नवनाथ मोराळे , अशोक टाचतोडे, अशोक चव्हाण, वैभव शिंदे , कचरू चांभारे , आतुल घोरड , बाबासाहेब गाडीवान , अमर पुरी, सुंदर कांबळे , लक्ष्मण भोसले, विनोद भोगे , रघुनाथ डोंगरे, प्रभाकर थापडे, रामेश्वर देसाई, संदिप साळुंके, अतुल खिंडरे, यांच्यासह सर्वांनी  त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

No comments