Breaking News

निराधारांनी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरावेत- उपजिल्हाधिकारी पाटील यांचे आवाहन


बीड :  संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृतीवेतन योजना शासनाकडून राबविण्यात येतात. या विविध योजनांचे लाभार्थी मंजूर करण्याकरिता महाऑनलाईन यांच्या मार्फत संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली असून बीड जिल्हयातील लाभार्थ्यांनी http://mahaonline.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन, उपजिल्हाधिकारी  प्रकाश पाटील यांनी केले आहे.
संजय गांध निराधार अनुदान योजना,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष  पुढीलप्रमाणे आहेत.
       अर्ज करण्यासाठी सर्व महा ईसेवा केंद्र, आपले सरकार केंद्र यांच्यामार्फत अर्ज करावेत. ग्राहक सेवा केंद्रामार्फत राष्ट्रीयकृत बँक, पोस्ट बँकमध्ये सध्याच्या सर्व लाभधारकांनी आपले खाते 15 सप्टेंबर 2020 उघडावे, राष्ट्रीयकृत बँके व्यतिरिक्त खाते असल्यास लाभार्थ्यांचे अनुदान पाठविण्यात येणार नाही . यासाठी पोस्टमन किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधावा.
                                                                    

No comments