Breaking News

दुचाकीवरील मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ

गौतम बचुटे । केज  
शहरात मंगळसूत्र चोरणाऱ्या दुचाकीवरील चोरांनी धुमाकूळ घातल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागात वळवल्याचे दिसत आहे.  केज तालुक्यातील साळेगाव मध्ये शेतात कामासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्याने हिसकावून पोबारा केला. या घटनेमुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

मिळालेल्या माहिती अशी की, दि. ५ सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी १२:३० वा. दरम्यान केज तालुक्यातील साळेगाव येथील उल्फत इसाक शेख वय ५५ वर्ष ही महिला केज-साळेगाव रस्त्याने आपल्या शेतातील बाजरीच्या पिकाची कापणी करण्यासाठी जात होती. ती शाम तेलंग यांच्या शेता जवळील पुला जवळ चालत असताना तिच्या मागून काळ्या रंगाच्या मोटार सायकवर आलेल्या दोघांनी तिला बजरंगचे शेत कुठे आहे? असे विचारले. मोटार सायकल वरील एकजण खाली उतरला व त्याने महिलेच्या पाठीमागे जाऊन अचानक तिच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे मणीमंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. त्याची किंमत ५१ हजार रु. एवढी असून महिलेच्या फिर्यादी वरून दि. ५ सप्टेंबर रोजी केज पोलीस स्टेशनला दोन अनोळखी विरुद्ध गु.र.नं. ३५३/२०२० भा.दं.वी. ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे पुढील तपास करीत असून अशा प्रकारच्या भर दुपारी घडलेल्या वाटमारीचा तपास हा पोलीसा समोर आव्हान आहे.
पोनि प्रदीप त्रिभुवन
पोउनी श्रीराम काळे

2 comments: