Breaking News

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रकरणी हायकोर्टाची बीड जिल्हा परिषदेला नोटीस

अँड. विशाल कदम
अँड. स्नेहल जाधव




















अंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना हजार करून घेत नसल्याने शिक्षकाची न्यायालयात धाव

औरंगाबाद :  आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना बीडमध्ये रुजू करून न घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला असताना त्यांची ही भूमिका शासनाच्या धोरणाच्या विरुद्ध असून राज्यशासनाने बिंदूला बिंदू बदली असून अतिरिक्त शिक्षकांचा आणि विद्यमान बदल्यांचा कसलाही संबंध नसल्याचे राज्य शासनाने कळून देखील शिक्षकांना हजर करून घेतले नाही.
या विरुद्ध बीड जिल्हा परिषदेत बदलून आलेल्या तीन शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात  घेतली असून खंडपीठाने याची गंभीर दखल घेतली आहे. न्यायमूर्ती गंगापूरवाला यांनी बीड जिल्हा परिषदेमध्ये हा नेहमीचाच प्रकार असून हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा असे मत व्यक्त करत बीड जिल्हा परिषदेला नोटीस बजावली आहे. सदरील तीन शिक्षकांनी आपल्या बिंदूवर जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांना समायोजित केले जावू नये, असं देखील याचिकेत म्हंटले असून यावर तात्काळ जिल्हा परिषद बीड ने न्यायालयात म्हणने सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. 

आंतरजिल्हा पद्धतीने बीड जिल्ह्यांमधून 51 शिक्षकांची इतर जिल्ह्यात बदली झाली आहे. व राज्यातील विविध जिल्हा परिषद मधून 41 शिक्षकांची बदली बीड जिल्हा परिषदेमध्ये झालेली आहे. आंतरजिल्हा बदली मध्ये मागील काळात मोठा भ्रष्टाचार झालेला असताना बिंदू ला बिंदू बदलून आलेल्या शिक्षकांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 
बीड जिल्हा परिषदेने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याबाबत पत्र दिले आहे. मात्र सदर बदल्या बिंदू च्या बदल्यांमध्ये बिंदू झाल्यामुळे सदरील जिल्हा परिषदांना बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे क्रमप्राप्त आहे. कारण त्यांच्या जागेवर इतर जिल्ह्यातून दुसरा शिक्षक येणार आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. 
बीड जिल्ह्यातून बदलून गेलेल्या 51 शिक्षकांच्या रिक्त झालेल्या बिंदूवर बीड जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांना समायोजित करण्याचा मानस जिल्हापरिषद बीडचा असून मात्र बदलून आलेल्या 41 शिक्षकांच्या बाबत जिल्हा परिषद बीड ची भूमिका स्पष्ट दिसत नाही. बदलून आलेले 41 शिक्षकांना अतिरिक्त म्हणून राहावे लागते की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. 
याविरुद्ध तीन शिक्षकांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मध्ये अँड. स्नेहल जाधव व विशाल कदम यांच्या मार्फत धाव घेतली असून सदर प्रकरणात स्नेहल जाधव यांनी युक्तिवाद केला.  न्यायालयाने या तीन शिक्षकांच्या बाबत जिल्हा परिषदेला नोटीस पाठविली आहे.

1 comment: