Breaking News

शिवणी मध्ये डॉ. भदंत आनंद कौसल्यायन नगरचे उदघाटन


बीड :   प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था, बीड. च्या वतीने अनेक दिवसापासून हाती घेतलेल्या कार्याची वाटचाल यशस्वी मार्गाने होत असून संस्थेने मौजे शिवणी ता.जि.बीड येथे गट नंबर 19 मधील 1 हे. 20 आर क्षेत्रफळ असलेली जमीन खरेदी करून मालकी हक्क प्राप्त केला, व त्या परिसरास डॉ.भदंत आनंद कौसल्यायन नगर, नाव देऊन  संस्थेचे अध्यक्ष डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो,सचिव भिक्खु धम्मशील यांच्या हस्ते व संस्थेच्या सर्व सन्माननीय सभासदांच्या उपस्थितीत उदघाटन झाले.

गेल्या अनेक वर्षापासून भिक्खु धम्मशील यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात धम्म संस्काराचे कार्य केले जात आहे.तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराची पेरणी करून मानव कल्याणाचे कार्य केले जात आहे.श्रामनेर शिबिर, महिला संस्कार शिबिर, वर्षावास, बौद्ध धम्म परिषद, 
संघदान सोहळा, बालसंस्कार शिबिर, धम्मदेसना अशा अनेक कार्य प्रणालीतून धम्माचे ज्ञानार्जन करण्याचे कार्य केले, त्यातूनच भिक्खु संघदान दर्शन सोहळा सर्व बीड करांना पहावयास मिळाला व धम्म संस्कार केंद्र निर्माण व्हावे असा विचार पुढे आला. बीड नगरीतील धम्म उपासक-उपासिका एकत्र येऊन सर्वानुमते विचाराने मार्ग स्वीकारून धम्म संस्कार शिक्षण केंद्राची मुहूर्तमेढ अखेर रोवली आणि सर्वांनी आनंद व्यक्त केला.
 संस्थेचे सर्व सन्माननीय सभासद व शिवणी  गावातील सर्व उपासक उपासिका या आनंदाच्या क्षणी उपस्थित होते.
       बीड जिल्ह्याच्या इतिहासात धम्मचळवळीचे कृतिशील पडलेले पहिले पाऊल आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शिवनी गावाला एक इतिहास आहे.भदंत आनंद कौशल्यायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे.1975 मध्ये याच ठिकाणी धम्मदीक्षा सोहळा भन्तेजींच्या हस्ते संपन्न झाला आहे.भदन्त आनंद कौशल्यायन यांच्या हस्ते शिवणी गावात बोधीवृक्ष लावण्यात आला.आजही तो बोधीवृक्ष आपणास प्रेरणा देत मोठ्या अभिमानाने उभा आहे.त्याच भूमिवरुन धम्मचळवळ गतीमान होत आहे याचा आम्हा सर्व  बीडकरांना सार्थ अभिमान आहे.
या उद्घाटनाप्रसंगी बोधिवृक्षाची लागवड करून सुशोभीकरणाच्या कार्याची सुरुवात करण्यात आली तर सर्वांच्या साक्षीने नवनिर्वाचित अजिव सभासद अभिमन्यू संतराम डोळस या स्थानिक रहिवाशांनी आपले सदस्यत्व प्राप्त केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे,सभासद प्रा. राम गायकवाड, प्रा. अशोक गायकवाड, डॉ. बालाजी घनघाव,डॉ. डी जी वानखेडे,कॅप्टन राजाभाऊ आठवले, प्रा. नामदेव शिनगारे,इंजि.भिमज्ञ वेडे,इंजि. कांचन गायकवाड एॕड. कल्याण  गाडे,वसंतराव तरकसे ,सखाराम उजगरे,पि.व्ही.बनसोडे, राजेन्द्र गुलाबराव भोले,प्रा. प्रदीप गाडे ,पंडीत चव्‍हाण, भास्कर सरपते,प्रा.विठ्ठल गाडे,अलका डोंगरे,मंदा मस्के ,शिलाताई वाघमारे,वंदना वाघमारे,प्रभावती रोडे,रत्नप्रभा भंडारे आदींसह धम्म उपासक-उपासिका बालक ज्येष्ठ उपासक मौजे शिवणी येथील धम्म उपासक-उपासिका उपस्थित होते.
उदघाटन कार्यक्रमासाठी प्रा. अंकुश कोरडे,जालिंदर माने,ॲड.राजेश वाघमारे,पंचशीला सरपते,गोरख डोळस, अंकुश डोळस,राजु डोळस पञकार गोरख कचरु डोळस यांच्यासह डोळस धम्म युवकांनी अथक परिश्रम घेतले.

2 comments: