Breaking News

बचत गटाच्या महिलांची आरोग्य शिबिरात तपासणी

के. के. निकाळजे । आष्टी 
तालुक्यातील कानडी खुर्द (मेहकरी) व खुंटेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कानडी (खुर्द) येथील महिलांची आरोग्य तपासणी शुक्रवारी (ता.०४) करण्यात आली. कानडी (खुर्द) येथे बारा बचत गटांतील एकशे सव्वीस महिलांनी कोरोना काळात गाव व परिसरातील गावात जनजागृती करत बेघर, अनाथ, विधवा, गरीब, मजूर, वृद्ध यांच्यासह अनेकांना आर्थिक मदत, बचत गटाच्या परसबागेतुन भाजीपाला, धान्य, मास्क वाटप, औषधांचे वाटप आदी कामे आजही करत आहेत त्यामुळे बचत गटांच्या महिलांची आरोग्य तपासणी होणे आवश्यक होते.
डॉ विनोद जोगदंड व त्यांच्या टीमने शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार व सामाजिक अंतराचे पालन करत आरोग्य तपासणी केली. या शिबिरात अविष्मान भारत योजनेअंतर्गत महिलांना कार्डचे वाटप करण्यात आले. या शिबिराला सरपंच सिंधुताई जगताप,  जिल्हा व्यवस्थापक मार्केटटिंग शंकर पवार, कृतीसंगम जिल्हा समन्वयक पृथ्वीराज खंडागळे, 'उमेद'चे  तालुका अभियान व्यवस्थापक कृष्णा सांगळे, तालुका व्यवस्थापक विक्रम ठोंबरे, दासू शेलार, उंबरहांडे बचत गटाचे अध्यक्ष व सचिव आदी उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी सीआरपी जैबून पठाण, अधार बचत गटाच्या अध्यक्षा शहिनाज शेख, सुन्नाबी पठाण, विकास ग्रामसंघाचे अध्यक्षा सुनीता गव्हाणे, आयशा पठाण यांनी परिश्रम घेतले.

No comments