Breaking News

अर्थव्यवस्थेवरून लक्ष विचलित करण्यासाठीच कंगना प्रकरण; खा. अमोल कोल्हेंचा आरोप


मुंबई: देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष विचलित करण्यासाठीच कंगना प्रकरणाला हवा दिली जात आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. कलाकारांनी सामाजिक भान जपलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.


एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी हा दावा केला आहे. देशातील कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष वळवण्यासाठीच कंगना प्रकरणाला हवा दिली जात आहे. त्याचा बोलविता धनी कोण आहे. हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या वक्तव्यावरूनच ते दिसून येत आहे, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले. एखाद्या वक्तिला किती महत्त्व द्यायचं हे ठरवले पाहिजे. कलाकारांनीही कोणत्याही गोष्टीवर भाष्य करताना सामाजिक भान जपले पाहिजे, असे सांगतानाच देशात रोज हजारो केसेस सापडत आहेत. त्याचंही सर्वांनी भान राखले पाहिजे, असे ते म्हणाले.

No comments