Breaking News

बीडकरांना पावसाने झोडपले....


बीड : सकाळ पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अचानकपणे दरम्यान मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची धांदल उडाली होती.  तब्बल दोन तासांच्या वर धो धो - पाऊस पडला. मात्र कामानिमित्त बाहेर आलेल्या बीडकरांना मात्र पावसानं चांगलचं झोडपून काढलं.

गेल्या दोन-चार दिवसांपासून उखाडा वाढला होता. त्यामुळं गर्मी होऊ लागल्याने नागरिकांची लाहीलाही होऊ लागली होती. बीडचा रविवारी आठवडी बाजार असल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी भाजीपाला तसेच आपला माल विक्रीसाठी आणला होता.  चाकरमानी यांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारात एकच गर्दी केली होती. परंतू, सकाळ पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पावसानं अचानक हजेरी लावली. त्यामुळे आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांसह नागरीकांची तारांबळ उडाली.

No comments