Breaking News

निवृत्त तहसीलदार सुधाकर भगवानराव रामदासी यांचे निधन


बीड : 
मुळ गेवराई येथील व सहयोग नगर मधील रहिवाशी सेवा निवृत्त तहसिलदार सुधाकर रामदासी यांचे  समर्थ निवास  या राहत्या घरी गुरूवारी  निधन झाले. मृत्यु समय त्यांचे वय 72  वर्षे होते.  


गेवराई  तालुक्यातील मादळमोहीच्या रामदासी परिवारातील समर्थभक्तीच्या प्रचार आणि प्रसारात सुधाकर रामदासी अनेक दशकं अग्रेसर होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन अथक परिश्रमातुन सुधाकरआण्णांनी तहसीलदार पदापर्यंत मजल मारली.
 बीड जिल्ह्यात समर्थ विद्यापीठाचं परीक्षा केंद्र आणि पत्रद्वारे दासबोध परीक्षेचं केंद्र त्यांनी चालवलं, अनेक मेळावेही घेतले आयुष्यभर समर्थसेवेच्या कामात वाहून घेतले होते.अनेक वर्षांच्या शासकीय सेवेत त्यांनी पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा हे तत्वंही जपले, निवृतीनंतर पुर्णवेळ समर्थ सांप्रदायासाठी देत श्रीराम मंदीर संस्थान मठ,मादळमोहीवर  माहीती पुस्तिकेच काम हातात घेत यशस्वी करून दाखवले. जांब, सज्जनगड, शिवथरघळ ते तामिळनाडूतील तंजावरपर्यंत देशभरातील समर्थ स्थापित मठांना त्यांनी भेटी दिल्या.

 बीड जिल्ह्यातील समर्थ सांप्रदाय  तसेच  उत्तर गीता  या पुस्तकाच्या संशोधनात आणि लिखाणात त्यांनी मोठा वाटा उचलला होता. संस्कार भारतीच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असे. अनेक नाटकांच्या राज्यस्तरीय स्पर्धेतही सहयोग नगर मधून त्यांनी मोठमोठी नाटके नेली होती. अनेक नाटकांना राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले होते.  सहयोग नगरमधील गजानन महाराज मंदिर स्थापनेच्या कामात अध्यक्ष म्हणून त्यांचा मोलाचा वाटा होता. गुरुवारी त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसस्कार करण्यात आले. 


No comments