Breaking News

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गुरुवारी शेतकऱ्यांशी साधणार ई - संवाद


शेतक-यांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

बीड :  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या “विकेल ते पिकेल" या संकल्पनेवर आधारीत कृषि विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.  या अनुषंगाने गुरुवारी (दि.10) रोजी दुपारी 12.30 वाजता राज्यातील शेतक-यांशी ई-संवाद साधाणार  आहेत. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील शेतक-यांना http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoMया लिंक क्लिक करुन परिसंवादात  सहभागी होता येणार आहे.

जिल्ह्यात ग्रामस्तरावरील तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहायक व ग्रामस्तरावरान इतर यंत्रणा यांनी कार्यक्रमाचे आयोजन करुन जास्तीत जास्त शेतक-यांना या संवादात सहभागी  करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. 

No comments