Breaking News

प्रसिद्धी न करता शिवसंग्रामचे अमजद (शहेंशाह) खान पठाण यांनी केलेले कार्य आदर्श - जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे


लॉकडाऊनच्या कर्फ्यू काळात बेघरांना अखंडपणे अन्नदान केल्याबाबत कोविडयोद्धा म्हणून सन्मानित


बीड :  शहरातील ६ महिन्यांच्या लॉकडाऊन काळात कडक कर्फ्यू असताना बेघर, भिकारी, गोरगरीब, नगरपरिषद सफाई कामगार, अनाथ, निराधार आदींच्या पोटासाठी अन्न देखील उपलब्ध होत नव्हते. पहिल्या कर्फ्यूपासून ते आताच्या शेवटच्या कर्फ्यूपर्यंत भुकेलेल्यांना अन्न देण्याचे काम शिवसंग्रामचे अल्पसंख्यांक नेते तथा शहेंशाह ग्रुपचे अमजद (शहेंशाह) खान पठाण यांनी केले आहे. त्यांच्या या कोरोना काळातील मदतीबद्दल शिवसंग्रामच्या वतीने कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी कसलीही प्रसिद्धी न करता अमजद (शहेंशाह) खान पठाण यांनी केलेले कार्य आदर्श असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांनी केले.
   
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर, बसस्टँड, बशीरगंज, थोरातवाडी, बालेपिर आदींसह ज्या ठिकाणी बेघर, भिकारी, गोरगरीब, नगरपरिषद सफाई कामगार, अनाथ, निराधार आदींच्या भुकेला जाणून अन्न उपलब्ध करून देण्याचे काम अमजद (शहेंशाह) खान पठाण यांनी केले आहे. प्रत्येक दिवशी १०० पेक्षा अधिक भुकेल्यांना अमजद (शहेंशाह) खान पठाण हे खिचडी, मसाला भात यासोबतच अंडा बिर्याणी, चिकन बिर्याणी पर्यंत पुरवत होते. प्रत्येक दिवशी कमीतकमी १० किलो तांदूळ शिजवले जायचे, यामध्ये टंचाई जाणवली तर अजून ४ ते ५ किलो वाढ केली जायची. २ मोटारसायकलवर या अन्नाचे वितरण केले जायचे. याबाबत अमजद (शहेंशाह) खान पठाण यांनी कसलीही प्रसिद्धी न करता आपले काम सुरु ठेवले होते. शिवसंग्राम भवन येथे त्यांचा या कार्याबाबत संपूर्ण उपक्रमाच्या शेवटी काल यथोचित सन्मान करत कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी सरचिटणीस सुहास पाटील, तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, माजी सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, अझहर भाई, शकील भाई, सलमान अली, अख्तर पेंटर, शेख सलमान, समीर भाई, फारुख भाई, सुशांत सत्राळकर, विठ्ठल ढोकणे, बबन उबाळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

No comments