Breaking News

विजयकुमार इंगळे यांचा सेवानिवृत्त निमित्त साळेगावकरांनी केला सत्कार

गौतम बचुटे । केज
केज पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील हातपंप यांत्रिकी विजयकुमार इंगळे हे दि. ३१ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले त्या निमित्त त्यांचा साळेगाव येथे गावकऱ्यांनी सत्कार करून त्यांना निरोप दिला.

विजयकुमार इंगळे पाटील हे केज पंचायत समितीच्या ग्रामिण पाणी पुरवठा विभागात हातपंप दुरुस्ती विभागातील हातपंप दूरुस्ती तंत्रज्ञ म्हणून १९८४ साली रुजू झाले होते. त्यांनी ३६ वर्ष सेवा पार पडला नंतर विविहित वयोमर्यादे नुसार ते ३१ ऑगस्ट २०२० रोजी सेवा निवृत्त झाले. या निमित्त त्यांचा साळेगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ज्ञानेश्वर इंगळे पाटील, संभाजी सरवदे, वसंत पारखे, रविंद्र जोगदंड, दत्ता इंगळे, दत्तू लांडगे, अश्रूबा गित्ते, शिवाजी गित्ते, ज्योतिराम बचुटे, पांडुरंग इंगळे, ज्ञानोबा बचुटे, बलभीम बचुटे, सय्यद शब्बीरमियॉ, नवनाथ गालफाडे, बबन इंगळे, बशीर पटेल, लक्ष्मण लांडगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान विजयकुमार इंगळे यांचा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सरपंच कैलास जाधव पाटील आणि मुख्याद्याक सुरेश काळे यांनीही सत्कार केला तसेच ज्ञानेश्वर इंगळे यांच्या निवासस्थानी ज्ञानेश्वर इंगळे,सौ. शोभाताई इंगळे, डॉ. प्रवीण इंगळे यांनी सत्कार केला तर डीसीसी बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक जाधव साहेब, रवि जाधव आणि जाधव कुटूंबियांनी त्यांचा सत्कार केला.

No comments