Breaking News

शिवसंग्राम प्रणित महाराष्ट्र ऊसतोड कामगार संघटना आक्रमक


पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडणी साठी जाणारे कामगार थांबवले

बीड : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ऊसतोड कामगार यांना पश्चिम महाराष्ट्रातील टोळी मालक ऊसतोडणी साठी घेऊन जात असताना धारूर-केज महामार्गावर शिवसंग्राम प्रणित महाराष्ट्र ऊसतोड मुकादम,कामगार संघटनेचे अध्यक्ष बबनराव माने यांनी थांबवले व त्या सर्व ऊसतोड कामगार बांधवाना भाववाढ यावर्षी होणार आहे, तुम्ही भाववाढ मिळाल्याशिवाय ऊसतोडणी साठी जाऊ नये,अशी विनंती केली.व त्या सर्व ऊसतोड कामगार बांधवाना समजून सांगून परत सेनगाव तालुक्यात पाठवले.यावेळी सोबत शिवसंग्राम केज तालुकाध्यक्ष लिंबराज वाघ,युवक तालुकाध्यक्ष गणेश खांडेकर उपस्थित होते.यापुढे बीड जिल्ह्यातील सर्व ऊसतोड बांधवांनी एकत्रित येत संप यशस्वी करण्याचे अवाहन अध्यक्ष बबनराव माने,विश्वास पाटील,दत्ता जाधव यांनी केले आहे.  

No comments