Breaking News

महापूरूषांच्या नावानं बिडी विक्री बंद करा


वारकरी संप्रदायाची धारूर तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

किल्लेधारुर । हनुमान बडे 

आधी छत्रपती शिवाजी महाराज नंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं बिडीचे उत्पादन सुरू करण्यात आले होते. हे कमी की काय म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या नावाने नव्याने बिडी उत्पादनास सुरुवात केल्याचे निदर्शनास आल्याने वारकरी संप्रदायात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तात्काळ त्या बीडी वरील नाव आणी फोटो बदलावे तसेच महापुरुषांच्या नावाने बिडी उत्पादन करून विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करून त्याची विक्री बंद करून विकृत मानसिकतेच्या कंपन्यांना टाळे ठोकावे, अशी मागणी वारकऱ्यांनी धारूर धारूर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. 


 संत तुकाराम महाराजांनी कायम व्यसनी लोकांना व्यसन सोडण्यासाठी सल्ला दिलेला आहे.परंतु त्यांच्याच नावाने संत तुकाराम महाराज नावाचे बीडी उत्पादन नव्याने सुरू करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडी विक्री करण्यात येत होती.त्यावर सरकारने बंदी लावली असतानाच जगतगुरु तुकाराम महाराजांच्या नावाने आणि त्यांचा फोटो वापरून बिडीचे उत्पादन सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे.यामुळे वारकरी संप्रदायामध्ये याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.धारूर येथील वारकरी संप्रदायाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन तात्काळ संत तुकाराम महाराजांच्या नावाने चालवण्यात येत असलेले बीडी उत्पादन थांबवण्यात यावे आणि तयार केलेला बिडी साठा शासनाने ताब्यात घेऊन जाळून टाकावा अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना येथील वारकऱ्यांनी दिले आहे.या निवेदनावर महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हभप श्रीकृष्ण चवार महाराज, भालचंद्र कुलकर्णी, जगन्नाथ नरूटे, अंकुश साखरे, सुभाष देशमुख, अशोक आडसुुळे, उत्तरेश्वर कोळेकर, रामराव चोले, लिंबराज लाखे, राजेभाऊ लाखे, भास्कर देशमुख, भगवान खडके, चंद्रकांत देशपांडे, शिवाजी सुरवसे, बाबुराव सोळंके, शंकर सोळंके, अंगद करे या महाराजांसह वारकरी मंडळींनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करत आपला संताप व्यक्तत केला आहे.

1 comment: