Breaking News

देवराव लुगडे यांचा सत्कार

परळी  :   संभाजी ब्रिगेडच्या परळी तालुकाध्यक्ष पदी देवराव लुगडे महाराज यांची फेरनिवड झाल्याबद्दल परळी येथील देशमुख पार येथे   इंजि. संजय देशमुख यांच्या कार्यालयात आज इंजि. देशमुख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन तसेच त्यांचा सत्कार करण्यात आला.
       याप्रसंगी  इंजि.संजय देशमुख म्हणाले की, संपूर्ण परळी तालुक्यात फुले-शाहू-आंबेडकरी विचाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार-प्रचार करून नवीन पिढीला अंधश्रद्धेला मूठ-माती देऊन नवीन वैज्ञानिक दृष्टीकोनातून घडवावे अशा शुभेच्छा दिल्या. इंजि.साकसमुद्रे म्हणाले की, संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेला नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे. यावेळी फुले-आंबेडकरी अभ्यासक इंजि. भगवान साकसमुद्रे, पत्रकार जगदीश शिंदे,  इंजि. अजय कुरे, महेबूब कुरेशी, सुधीर ओपळे, इंजि. रामराजे देशमुख, इंजि. अरबाज पठाण, इंजि. अजय कदम आदींची उपस्थिती होती. आभार इंजि.रामराजे देशमुख यांनी मानले.

No comments