Breaking News

आ.सुरेश धस यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष?

फक्त तीनच नगरसेवक रस्त्यावर ; बाकी  सगळे घरी!

बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार 

आमदार सुरेश धस यांनी रविवार रोजी भल्या पहाटे मीटिंग घेऊन शिरूर कासार नगर पंचायती तील सर्व नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांना आप- आपल्या वॉर्डातील नागरिकांच्या अडचणी समजून घेण्या बाबत सूचना दिल्या होत्या. एक दिवस उलटला नाहीत तोच याचा विसर काही अपवाद वगळता जवळ-जवळ सर्वच नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना पडल्याचे दिसून आले. 


रविवारी सकाळी सहा वाजता आमदार सुरेश आण्णा धस यांनी शिरूर कासार नगरपंचायत येथे सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची मिटींग घेतली होती. या मिटींगमध्ये नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डातील नागरिकांच्या समस्या जाणून घेवून सोडवाव्यातअशा प्रकारच्या सूचना देखील दिल्या. तसेच प्रत्येक वार्डामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी.
अपूर्ण असलेली कामे पूर्ण करावीत.शहरातील ज्या लोकांची घरकुलांची कामे आर्थिक अडचणींमुळे थांबलेली असतील त्या लोकांना माझ्या मच्छीन्द्रनाथ मल्टीस्टेट मधून पैसे देतो.त्या लोकांचे चेक आल्यानंतर आपण परत घेवू.अशा सूचना देत उठ सुठ सोशल मीडियावर फोटो टाकून चमकोगिरी करणा-याना आमदार सुरेश धस यांनी आपल्या खुमासदार शैलीत रविवारच्या सकाळी चांगलेच झापले होते. मात्र एक दिवस उलताच याचा विसर जवळजवळ सर्वच नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना पडल्याचे दिसून आले.


चक्क आण्णांच्या सुचनेकडे दुर्लक्ष ?

गणेश भांडेकर , ज्ञानेश्वर उटे आणि दादासाहेब हरिदास यांचा अपवाद वगळता अन्य नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी अण्णांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याचे सोशल मीडियावर दिसून आले.

No comments