Breaking News

राज्यभरातील पहिलवानांनी गदा घेतली खांद्यावर..!


शिरूरचा पै.माऊली पानसंबळ करतोय राज्याच नेतृत्व; तर अनुभवी तसेच नवख्या नवशिक्या पहिलवानांचा मिळतोय पाठिंबा!

बाळकृष्ण मंगरूळकर । शिरूर कासार

संपुर्ण जगाला वेठीस धरलेल्या "कोरोना " महामारीची सर्वच क्षेत्राला ईजा पोहचली ,आतोनात नुकसान झालं त्याचप्रमाणे लाल मातीतील मैदानी खेळ असणा-या कुस्ती क्षेत्रावर देखील बला आली ,प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशभरात लॉकडाऊन पुकारला गेला , मठ,मंदिराबरोबर गर्दि होणारी सर्व ठिकाणाला टाळे लागले यातच  पहिलवानांच्या तालमी देखील बंद झाल्या त्याचा परिणाम कुस्ती क्षेत्राला भोगावा लागत आहे. राज्य शासनाने आता कांही अंशी शिथिलता देत दुकानाबरोबर कांही व्यवसाय सुरू केले मात्र मठ मंदिराबरोबर पहिलवानांच्या तालमी सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही ,पहिलवानांचे भविष्य घडवणा-या तालमी सुरू कराव्यात या मागणीसाठी आता राज्यभरातील पहिलवानानी मानाची गदा खांद्यावर घेत एल्गार पुकारला आहे.
याचे नेतृत्व शिरूरचा पै.माउली पानसंबळ करत असुन त्याच्या या मागणीला राज्यभरातील अनुभवी तसेच नवशिक्या पहिलवानांचा पाठिंबा मिळत आहे .पहिलवान तालीम सुरू करा अशा आशयाची मागणी लेखी निवेदनाद्वारे ठिकठिकाणी करू लागले पानसंबळ सतत संपर्कात असुन पहिलवानांना भेटी देत मागणीसाठी भटकंती करत आहेत .


राज्यभरात अनुभवी नामांकित पहिलवानांची संख्या जवळपास तीन हजार इतकी असुन नवखे नवशिक्या पहिलवानांची संख्या तब्बल दहा हजारांवर आहे ,हे सर्व पहिलवान त्यांच्या भविष्यासाठी तसेच देशासाठी लाल मातीचा घाम गाळून चिखल करत कुस्ती या मैदानी खेळाला देश विदेशात नावलौकिक मिळवुन देत आहेत ,महाराष्ट्रातील मैदानी खेळ मानली जाणारी कुस्तीच आता मातीत लोळू पहातेय ,कोरोना महामारी मुळे सरावासाठी असलेल्या तालमी बंद झाल्या परिणामी सरावच नसल्याने स्पर्धा जिंकायच्या कशा असा मोठा जटील प्रश्न समोर उभा असतांना तालमी सुरू करून कुस्तिचे व राज्याचे वैभव कायम ठेवण्यासाठी आता तालमी सुरू करा अशी मागणी करत राज्यभरातील नवे जुने पहिलवान संघटीत करून पानसंबळ यांनी हा लाल मातीचा लढा गेली दहा दिवसांपासून सुरू केला आहे .राज्यभर पदरमोड करत पानसंबळ सारखे भटकंती करत आहे ठिकठिकाणी पहिलवान एकत्र येत निवेदन देताना आपला पाठिंबा दर्शवत आहेत. आतापर्यंत बीड जिल्ह्यासह आष्टी ,जामखेड ,पाटोदा ,गेवराई ,पाथर्डी ,
अहमदनगर ,शेवगांव , पैठण ,मुंगी ,बोधेगांव भिंगार ,नालेगाव, जालना ,तुळजापुर ,उस्मानाबाद , औरंगाबाद करत थेट श्रीगोंदा, बारामती ,सांगली ,सातारा, सांगोला , सोलापुर ईथपर्यंत संपर्क करून पहिलवान संघटीत केले असुन त्या ठिकाणाहुन तालीम सुरू करा अशी निवेदन देत माऊलींच्या या "गदा" आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे .
सर्वदुर ख्यातीप्राप्त व नामांकित पुरस्कार प्राप्त पहिलवान पाटोदा जिल्हा बीड सारख्या ठिकाणचा "अर्जुन " पुरस्कार विजेता राहुल आवारे ,आष्टिचा महाराष्ट्र केसरी सय्यद चाउस ,जालन्याचा महाराष्ट्र केसरी बाला रफिक,महाराष्ट्र् चॅम्पियन कोल्हापुरचा मारूती जाधव ,सांगलीचा दोनदा महाराष्ट्र केसरी पुरस्कार विजेता चंद्रहार पाटील ,माऊली जमदाडे सारखा राष्ट्रीय खेळाडू ,शिंकदर शेख सारखा एका महालाचा पोरगा जो की सध्या सैन्यदलात देशाची सेवा करतोय यांच्यासारख्या नावाजलेल्या पहिलवानांनी पाठबळ दर्शवले असुन तालीम सुरू कराव्यात अशी विनंती शासनाकडे करत आहे .कुस्ती हा खेळच मुळी मैदानी असल्याने तो महाराष्ट्र्राचा मानबिंदु मानला जातो ,तालमीत केलेल्या सरावामुळे नामांकित पहिलवान अगदी ग्रामीण भागात देखील घडू शकतात हे अनेकांनी दाखवून दिले आहे आणि अशा खेळाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी तालीम तर सुरू कराच तर याशिवाय पहिलवांनाना व तालमींना प्रोत्साहन पर भरघोस अनुदान देण्याची मागणी केली जात आहे .


कुस्ती क्षेत्रातुन स्व.मारूती मानेसारखे खाजदार झाले या क्षेत्राला एक उज्वल गुरू परंपरा लाभलेली असुन स्व.हिंदकेसरी अर्जून वीर गणपत आंदळकर ,मामासाहेब मोहोळ ,बीराजदार मामा ,काका पवार सारखे अन्य किती तरी गुरूंनी कुस्तिक्षेत्राला यशाच्या शिखरावर नेले तीच परंपरा आजही जतन करणा-या तालमी बंद असल्याने कुस्तीचे आतोनात नुकसान होऊ पहात आहे .कुस्तीत देखिल गुरू शिष्य हे नाते अतुट असते परंतू त्यात सध्या दुरावा निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी हा सारा प्रयास आहे .
तालीमी सुरू करा यासाठी विजय चौधरी तीनवेळा महाराष्ट्र केसरी,अमोल मुंडे(महाराष्ट्र चॅम्पियन ) पुणा,सयाजी कोळेकर कोल्हापुर,सागर मोहळकर शाहुपुरी आखाडा ,सुरेश घुगे पाटोदा ,सचिन घोंगरे तुळजापुर ,बापुराव जरे आदी नामांकित पहिलवानांनी माऊलीच्या या आंदोलनाला महत्त्व आणून दिले आहे .


लोकमत बरोबर संवाद साधत असतांना पै .माऊली पानसंबळ यांनी एका पहिलवानाचा महिण्याचा खुराक खर्च किमान पंधरा ते पंचवीस हजार असतो ,हा खर्च भागवण्यासाठी पहिलवान जत्रा ,आखाडे यामधे आपले कौशल्य पणाला लावतो बक्षीस कमावतो त्यावर मागवतो मात्र आता खुराक घेणे त्याच्या आवाक्याबाहेर झाले पहिलवाणाच्या खुराकात पौष्टिक व महागड्या वस्तूंचा अंतर
भाव असतो ,वजन गटाप्रमाणे कुस्त्या खेळल्या जातात तसे पुरस्कार मिळवले जातात हे करण्यासाठी सरावात आणि खुराकात सातत्य असणे गरजेचे आहे तालीम बंद असल्याने कुस्तीक्षेत्र धोक्यात आले आहे ,सरकारने याला पुन्हा चांगले दिवस आणन्यासाठी तालीम सुरू कराव्यात ,भरघोस अनुदान द्यावे .तातडीने तालीम सुरू करा किंवा महाराष्ट्र केसरी अजिंक्य स्पर्धा लांबणीवर टाका अशी मागणी केली आहे.
शुक्रवारी बीडचे जिल्हाधिकारी शिरूर दौऱ्यावर आले असताना माऊली पानसंबळ यांनी त्यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

तालीम बंद म्हणून दंड ,बैठका,जोर ,सपाटी व आखाडा खोदणे असा सराव बंद झाला असल्याचे पानसंबळ यांनी सांगितले.

No comments