Breaking News

प्रहारच्या एकजुटसंघर्षा मुळे अपंग आयुक्त देशभ्रतार यांनी अपंगावर लादलेले परिपत्रक घेतले मागे - शाहु डोळस यांची माहिती

बीड :  महाराष्ट्र राज्याच्या अपंग आयुक्त प्रेरणा देशभ्रतार या अपंगांच्या विषयी राज्यस्तरावर काम करण्यासाठी अपंग आयुक्त म्हणून पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांनी दिनांक २८ ऑगस्ट २०२० रोजी एक शासनाच्या वतीने परीपत्रक काढून त्यात असा उल्लेख केला की, अपंगांना सल्ला व मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात येत आहे. त्या कक्षातील व्यक्तीचा खर्च हा अपंगांच्या ५ टक्के निधीतून करण्यात येईल. तसेच अपंगांना मार्गदर्शन करण्यासाठी वकिलांची नेमणुक करण्यात येईल. ही बाब जेव्हा प्रहारचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बापुरावजी काणे यांच्या निदर्शनास आली. तेव्हा पुणे येथे येऊन प्रहारचे उपाध्यक्ष अभय पवार, दत्ता भोसले व राजेंद्र वाघचौरे व इतर शेकडो पदाधिकारी घेऊन पुणे येथील अपंग आयुक्त कार्यालया समोर दि.१८ ऑगस्ट २०२० चे अपंगावर अन्याय करणारे परीपत्रक मागे घेण्यात यावे, या साठी तिव्र आंदोलन केले. 


बापुरावजी काने यांचे सह राजेंद्र वाघचौरे, आभय पवार, दत्ता भोसले व इतर पदाधिकारी यांनी आपंग आयुक्त देशभ्रतार यांचेशी सविस्तर चर्चा करून तो निर्णय तात्काळ मागे घेवा. नसता आपल्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान ना. बच्चुभाऊं कडू यांच्या ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली होती. याची तात्काळ दखल घेत तेव्हा बच्चुभाऊंनी आयुक्त देशभ्रतार यांच्याशी  चर्चा करून तो,  निर्णय ताबडतोब मागे घेण्यास भाग पाडले. शेवटी आपंगांनी तात्काळ या निर्णयाविरोधात आयुक्ता समोर विरोध केला. म्हणुन अपंगांचा ५ टक्के निधी अपंगांच्या जागरूकते मुळे व  ना. बच्चुभाऊंच्या रेट्यामुळे इतरत्र जानारा निधी वाचला. त्या बद्दल प्रहारच्या महाराष्ट्रातील अपंग बाधवांच्या व बीड जिल्हयाच्या वतिने प्रहार अपंग क्रांती आंदोलन जिल्हा बीडचे उपाध्यक्ष यांच्या मुळे शाहु डोळस, राजेंद्र आडागळे, कमलकर वेदपाटक, विष्णुपंत सवासे, नंदकुमार झाडे, नागनाथ सावजी, बीबीशन आंबाड, डोंगरे, रमेश चव्हान, गवळी, शेप राम, शेख रहिम, भाऊ दराडे, झीजुरडे, दत्ता कदम, संदिपान बारगजे महानुभव, पद्मिन तारडे, इंगळेताई, किशोर साळवे,नशिरभाई, बनेमिया, प्रभु माणे, कोकणे राम, आन्ना कदम, सतिश नेवडे, बाबा थोरात,धनंजय गिरी, सतेश जाधव, नरवडे, काशिद व इतर पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

No comments