Breaking News

भगतसिह यांचे क्रांतिकारी विचारच देश व लोकशाही वाचवू शकतात :-राजेंद्र आमटे


बीड : 
देश हा आज तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. देशात कोरोनाच्या महामारी मुळे देशातील अनेक तरुणाच्या नोकऱ्या बुडाल्या, सुजलाम सुफलाम असणारा भारत देश हा आज कंगाल देशाच्या यादीत जाण्याची भीती वर्तवली जात आहे. 
      
 गरीब हा जास्त गरीब होत चालला आहे व श्रीमंत हा पैशाच्या बळावर श्रीमंत होत आहे.देशातील 90%पैसे हा 10 %श्रीमंताच्या घशात  घातला जात आहे.फाईव्हस्टार हॉटेल मध्ये हजारो रुपयाचे जेवण दोन घास खाऊन फेकून दिले जात आहे. आणि फुटपाथवर झोपणाऱ्या गरिबाला एक वडापाव भेटणे मुश्कील झाले आहे.सकाळी जेवले तर रात्र उपाशी पोटी पाण्यावर काढण्याची वेळ अनेक कुटूंबाना आहे.
      

 देशात गोर-गरिबांच्या पोटा पेक्षा नाट्याच्या थाटांवर आज ची इलेक्ट्रॉनिक मीडिया दंग आहे.या देशावर श्रीमंतीचा जितका अधिकार आहे तितकाच गोर-गरीब सर्वसामान्य माणसाचा आहे.  देशात जात-धर्म वंश या पेक्षाही देशातील लोकशाही टिकणे काळाची गरज आहे .आज भगतसिंग यांचे क्रांतिकारी विचारच  देश व लोकशाही वाचवू शकतात असे प्रतिपादन शिवसंग्राम कार्यालयात भगतसिंह जयंती साजरी करताना राजेंद्र आमटे यांनी व्यक्त केले या वेळी भगतसिह यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसंग्राम सरचिटणीस सुहासजी पाटील व युवा नेते  मनोज जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राजेंद्र आमटे,सुहासजी पाटील,मनोज जाधव,रवी हातांगळे, लंगोरे सर,साळवे सर,शेख शरीफ,विष्णू शिंदे,सय्यद चांद भाई,लक्षुमन पवार,शेख गणी,शेख  यजुउधीन, कुंभरकर नागेश, सय्यद राजांक,
आदी च्या उपस्थित होते. 

No comments