Breaking News

बहुजन मजूर पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी राम वाघमारे

बीड :  मानवी हक्क अभियान या संघटने सोबतच कर्मवीर एकनाथ अवाड साहेब यांनी बहूजन मजूर पक्षाची स्थापना महाराष्र्ट राज्यात केली होती. त्याच नव्या जोमाने मानवी हक्क अभियानचे राष्र्टिय नेते डाॅ.मिलिंद नाना अवाड साहेब यांनी पून्हा राज्यात झंजावात करत मराठवाड्यातील आठ हि जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांच्या निवडी केल्या आहेत.
ह्या पक्षाचे अध्यक्ष दादासाहेब क्षिरसागर (अवाड साहेब यांचे सहकारी)असून त्यांच्या मार्गदर्शना नूसार नव्या उम्मीदीने डाॅ.मिंलिद अवाड यांनी बीड जिल्ह्यातील नवतरूणांच्या जनसंपर्कातील जनसेवक म्हणून ओळख असणारे राम वाघमारे यांची निवड डाॅ.मिलिंद अवाड साहेब यांनी करून खर्‍या  तरूण तडफदार व्यक्तीम्हत्वाला न्याय दिला आहे.या निवडीचे स्वागत मा.ह.अभियानचे राजेश घोडे यांनी केले तसेच राम वाघमारे यांचा माजलगाव येथे दत्ता कांबळे,आरेफ खैरूल्ला खान,अशोक ढगे,नितिन अडागळे,अलिशेर,धोंडीबा हतागळे,मुस्ताक कुरेशी,आदर्श मूजमूले,आजम ,यांनी सत्कार करूण शूभेच्छा दिल्या व सर्वच स्तरातून या निवडीचे स्वागत होत आहे.

No comments