Breaking News

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे करावेत

शिवसंग्राम सरचिटणीस अनिल घुमरे यांची मागणी

बीड : 
 जिल्ह्यात विविध ठिकाणी काल मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. सध्या प्रशासनाकडून पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र निवडक पिकांचे पंचनामे करण्यात येत असून सर्वच नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी शिवसंग्राम सरचिटणीस अनिल घुमरे यांनी केली आहे.

  बीड तालुक्यातील पिंपळनेर, नाथापूरसह लिंबारुई (देवी), रंजेगाव, पिंपळादेवी, आडगाव, सांडरवन, पाटेगाव, बोरदेवी, मुगगाव आदीसंह इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून पिकांचे नुकसान झालेले आहे. या ठिकाणी निवडक पिकांचे नुकसान पंचनामे केले जात असून सर्वच पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी शिवसंग्राम जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, रमेश चव्हाण, गोपीनाथ घुमरे, मुकुंद अबुज, सिद्धेश्वर नांदे, लांडे, दुबाले, नरवडे, डोईफोडे यांनी केली आहे.   

No comments