Breaking News

शेजारणीचा केला विनयभंग

z


जगदीश गोरे । धारूर 

शेतात निघालेल्या शेजारणीचा पाठलाग करून शेजाऱ्याच्या टग्यान तिला रस्त्यात अडवित तिचा हात धरून पदर ओढला विनयभंग केला. मात्र प्रसंगधाव राखून तीन त्याच्यापासून स्वतः ची सुटका केली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून टग्या विरोधात धारूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार धारूर तालुक्यातील एका गावातील टग्या  आपल्या शेजारणीची नेहमी छेड काढत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असे. तू मला खूप आवडतेस माझ्याबरोबर फोनवर बोलत जा, अशी सतत विनवणी करून लगट साधण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान शेतात जात असताना त्या विवाहित महिलेला रस्त्यात अडवून तिचा हात धरून पदर ओढत तिचा विनयभंग केला. घडल्या प्रकाराबद्दल कोणास काही सांगितले तर  तुझा संसार चालू देणार नाही, अशी धमकी त्यानं दिल होती. भीतीपोटी तीन याबद्दल कोणालाही काही सांगितले नाही. त्यामुळे त्या टग्याने तिला जास्तच त्रास देण्यास सुरवात केली.

 24 सप्टेंबर रोजी गावातील नदी वरून कपडे धूवून येत असताना  घराजवळ राहाणा-या शेजाऱ्याने एकटीला गाठून माझ्या जवळ आला व मला म्हणाला की, मी तुझ्यासाठी खास मोबाईल आणला असुन या मोबाईल वरून येथुन पुढे मला बोलत जा असे म्हणुन त्याने तिच्या अंगावर मोबाईल फेकुन देत  तू मला खुप आवडतेस अस म्हणत तिचा हात वाईट हेतुने धरुन लज्जास्पद असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरून त्या टग्या विरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पोलीस कॉन्स्टेबल सुनिता साळवे करत आहेत.


No comments