Breaking News

इंजि.साकसमुद्रे हल्ल्यातील आरोपी सचिन कागदेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

एका महिन्यापासून फरार असणाऱ्या आरोपीस न्यायालयाची चपराक 

परळी  : परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटदार तथा फुले-शाहू-आंबेडकरी अभ्यासक, मुक्त पञकार इंजि.भगवान साकसमुद्रे हल्ला प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय अंबाजोगाईच्या  न्यायाधीश श्रीमती एम.बी. पटवारी यांच्या न्यायालयात दि.१० सप्टेंबर रोजी आरोपी न.प.परळी चा  भाजप गट नेता सचिन कागदे व राहुल कागदे यांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळण्यात आला. 

   सविस्तर माहिती अशी की, दि.०६ ऑगस्ट रोजी दु.२.०० वा. थर्मल च्या निविदा भारण्यावरून शाब्दिक चकमक होऊन कमरेला असलेला पिस्तूल चा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन, नंतर रोडे चौकातील नाईकवाडेचे दीपाली हॉटेल मध्ये बसून त्यांच्या साथीदारांना बोलवुन दु.२.३० च्या सुमारास तलवार व लाथाबुक्क्यांनी साकसमुद्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. सदरील घटना सी. सी. टी. व्ही. च्या फुटेज मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी संभाजीनगर पोलीस स्टेशन परळी येथे गुन्हा नोंद आहे. 
     गुंड प्रवृत्तीच्या सचिन कागदे व त्याच्या साथीदार यांना जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी विशेष लक्ष घालून समाजात दहशत पसरविणारया आरोपी सचिन  कागदे व राहुल कागदे यास विशेष पथक नेमून जेरबंद करण्याची मागणी विविध संघटनांनी केलेली होती. या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल  धस, यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर  पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, तपास अधिकारी चांद मेंढके हे करत आहेत. 
    सदरील प्रकरणातील आरोपी सचिन कागदे व राहुल कागदे महिन्याभरापासून फरार आहेत. त्यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जमीन अर्जावर दि.९ व १० सप्टेंबर रोजी जिल्हा सत्र न्यायालय अंबाजोगाईच्या  न्यायाधीश श्रीमती एम.बी. पटवारी यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन आरोपींचा जमीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून ऍड.ए.व्ही. कुलकर्णी तर त्यांना सहकार्य ऍड. दिलीप चौधरी व ऍड.गोरे आदींनी काम पहिले.

No comments