Breaking News

नगरसेवक राधेश्याम येवले निराधार समितीच्या अध्यक्षपदी


गेवराई तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर 


गेवराई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शिफारशी नुसार बीड जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार गेवराई तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठीत करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राधेश्याम येवले यांची समितीचे नूतन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून नूतन अध्यक्ष व सदस्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गेवराई तालुक्यातील हजारों निराधार, अपंग, विधवांना मोठया प्रमाणात लाच घेऊन अनुदान मंजुरी पत्राचे वाटप निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपा आमदारांनी केले होते. गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्ता असतांनाही सुमारे वर्षेभरानंतर सुद्धा लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले नसल्याने बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता. भाजपच्या काळातील निराधार समितीने मोठा गैरव्यवहार केल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारच्या काळात नव्याने गठीत समितीला महत्त्व निर्माण झाले आहे. मागील शासनाच्या काळात निराधार समिती स्थापन करण्यास झालेला विलंब लक्षात घेता निराधारांच्या सोईसाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी तात्काळ निराधार समिती गठीत केली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित आणि बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शिफारशी नुसार  पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार गेवराई तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष म्हणून नगरसेवक राधेश्याम येवले तर सदस्य म्हणून शिवाजी डोंगरे, श्रीमती सय्यद सहरूनिस फतेमा, बापू गाडेकर,  मुक्ताराम आव्हाड, शेख मन्सूर, नंदकिशोर झाडे, ज्ञानेश्वर नवले, रघुनाथ मोरे व बंडू घोलप यांची निवड करण्यात आली आहे.समिती गठीत केल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाले आहेत. नूतन अध्यक्ष व सदस्य यांचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सभापती जगन पाटील काळे, संग्राम आहेर, ऋषिकेश बेदरे, दिपक आतकरे यांचेसह आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments