Breaking News

जातीवाचक शिवीगाळ करत दोघांना केली मारहाण : आठ जणांविरोधात अट्रोसिटी दाखल


गौतम बचुटे । केज
 तू आमच्या घरासमोरून का गेलास असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून काठीने दोघांना मारहाण केल्याची घटना घडली.  या प्रकरणी आठ लोकांच्या विरोधात अँट्रोसिटी आणि मारहाणीचे गुन्हे पोलिसात दाखल करण्यात आले आहेत.


या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील शिंदी येथे दि.२ सप्टेंबर रोजी सकाळी ७:०० वा च्या दरम्यान प्रशांत बाबू काळे व त्याचा भाऊ काळे हे वसंत जाधव यांच्या घरा समोरून जात असताना वसंत जाधव व संजीवनी वसंत जाधव यांनी तुम्ही आमच्या घरा समोरून का जाता? आमच्या शेळ्या चोरीला गेल्या आहेत. असे म्हणून जातीचाचक शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी प्रशांत काळे यांच्या घरी जावून दिपक जाधव व संजीवनी जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. त्या नंतर फिर्यादीचे वडील बाळू काळे व भाऊ आशिष काळे हे ग्रामपंचायतकडे जात असताना दिपक जाधव व निलेश जाधव यांनी गावच्या वेशी बाहेर जावून फिर्यादी प्रशांतचा भाऊ आशिष यास निलेश पटाईत याने उजव्या हाताचे करंगळीच्या बाजूच्या बोटास चावून दूखापत केली. त्यामूळे ते दोघे फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले असताना आरोपी वसंत जाधव आणि इतरांनी फिर्यादी बाळू काळे यांच्या आत्याच्या घरा समोर जावून निलेश पटाईत याने फिर्यादी प्रशांत काळे याच्या डाव्या हाताच्या मनगटावर काठीने मारून फॅक्चर केले. तसेच दीपक कदम याने काठीने दोन्ही पायावर मारून मारहान केली. व इतरांनी फिर्यादी प्रशांतच्या आई गंगाबाई काळेहीस लाथाबूक्याने चापटाने मारहाण करून मूक्का मार दिला. जातीवचक शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी प्रशांत काळे याच्या तक्रारी नुसार केज पोलीस स्टेशनला दि. २ सप्टेंबर रोजी गु.र.नं.३४६/२०२० भा.द.वि. ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ यासह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३(१), (आर), (एस) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे पुढील तपास करीत आहेत.

No comments