Breaking News

'न्यू व्हिजन' मध्ये थॅंक्स टिचर अभियान


नेकनूर : बीड तालुक्यातील नेकनूर येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल मध्ये थॅंक्स टीचर अभियान अतंर्गत शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले भेटकार्ड आपल्या आवडत्या शिक्षकांना  ऑनलाईन फेसबुक, वाँटसप माध्यमाद्वारे भेट दिले.

कोरोणा मुळे शाळा बंद आहेत त्यामुळे मुले घरीच आँनलाईन शिक्षण घेत आहेत. शाळेत साजरी होणारे उपक्रम शाळा बंद आहेत त्यामुळे घेता येत नाहीत मात्र घर बसल्या मुलांचा उत्साह वाढवा म्हणून न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या  प्राचार्या स्वातीताई पोकळे ,भारत पटाईत सर, विनोद कळेकर सर, अमित बनसोडे सर, वरपे मिस, आयशा मिस, अनिशा मिस, कल्पना मिस , हे नवनवीन उपक्रम विद्यार्थ्यानसाठी राबवितात आहेत.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेतील मुलांना  शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भेटकार्ड तयार करायला सांगितले त्याच बरोबर आपल्या आवडत्या शिक्षकांबद्दल मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगितले या उपक्रमात विद्यार्थ्यांनी भरपूर प्रतिसाद साद दिला चौरे इंद्रजीत, वेदांत भंडारी, वेदांत महामुनी, सय्यद हस्नेन यांनी खूप छान शिक्षकाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्या स्वातीताई पोकळे यांनी अभिनंदन केले.व सर्व शिक्षक,पालक,विद्यार्थी यांचे आभार मानले..

No comments