Breaking News

सावता परिषदेतर्फे बापू गाडेकर यांचा सत्कार


बीड :  अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष बापू गाडेकर यांची गेवराई तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सावता परिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

        गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहांमध्ये छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शाम (काका) येवले यांचाही मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
            याप्रसंगी बोलताना सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ. अमरसिंह पंडित व माजी जि. प. अध्यक्ष युवा नेते विजयसिंह पंडित यांची जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, पंचायत समिती, मार्केट कमिटी, साखर कारखाना, नगरपरिषद यासह त्यांच्या ताब्यात असलेल्या तालुक्यातील विविध संस्था व समितीवर माळी समाजाला प्रतिनिधित्व देण्याची भूमिका नेहमीच राहिलेली आहे. आताही बापूराव गाडेकर यांच्या रूपाने माळी समाजाला त्यांनी आवर्जून संधी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात या नेत्यांचे पाठबळ वाढविण्यासाठी सावता परिषदेचे तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यरत रहावे असे अवाहनही त्यांनी केले.
         सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष किशोर राऊत यांनी बापू गाडेकर हे सामाजिक जाणीव असणारे व्यक्तिमत्त्व असल्यामुळे उपेक्षितांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली तर नेतृत्वाच्या अपेक्षेप्रमाणे काम करून मिळालेल्या संधीचे सोनं करावे असे मार्केट कमिटीचे सभापती जगन पाटील काळे म्हणाले.
          माजी आ. अमरसिंह पंडित व युवा नेते विजयसिंह पंडित यांच्यामुळेच आपली निवड झाल्याचे बापुराव गाडेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच अत्यंत आवर्जून सत्काराचे आयोजन केल्याबद्दल सावता परिषदेचे आभारही त्यांनी मानले.
           याप्रसंगी ऍड. सर्जेराव मेघारे यांच्यासह सावता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश साखरे, तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन शिंदे, सदाभाऊ वादे, अश्विनी जवंजाळ, गणेश काशीद, संतोष दिलवाले, सोमनाथ अंतरकर, हनुमान गायकवाड, राधेशाम लेंडाळ, विष्णू जवंजाळ, सोमनाथ काळे, ब्रह्मदेव चौधरी, मंगेश बलुतकर आदी सावता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती होती.

No comments