Breaking News

आ. मेटे यांनी लक्ष घालताच बीड शहरातील जाणीवपूर्वक थांबवलेल्या रस्त्यांची कामे झाली सुरुशिवसंग्राम बीडकरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे - अनिल घुमरे

बीड :   शहरातील रस्ते क्षीरसागरांकडून जाणीवपूर्वक अडवले जात आहेत, यामुळे  बीडकरांचे हाल होत असून महिनोनमहिना रस्ते खोदून ठेवण्यात येत आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी आणि सांडपाणी साचत असल्याने लोकांचे आरोग्यसुद्धा धोक्यात आले आहे. डेंग्यू अन मलेरियाचे शेकडो पेशंट कोरोनासोबत वेगवेगळ्या दवाखान्यात पाहायला मिळत आहेत.

     अपघातांमध्ये जखमी होण्याचे प्रमाण तर शेकडोंमध्ये आहे. काल दि २८ सप्टेंबर रोजी सकाळी ०९:३० वाजता जिल्हाधिकारी कार्याकायात जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आ श्री विनायक मेटे यांनी बीडच्या जनतेला अर्धवट रस्ता कामांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत माहिती दिली. यावेळी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री गुट्टे यांना जिल्हाधिकारी यांनी शहरातील रस्त्याची कामे तात्काळ सुरु करण्यात यावीत तसेच जो कुणी चालू कामे जाणीवपूर्वक थांबवण्याचे काम करेल त्यांच्यावर कलम ३५३ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी असे आदेश त्यांनी दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर शहरातील कामे सुरु झाली आहेत. कॅनॉल रोड, हिरालाल चौकात हि कामे सुरु झाली असून उर्वरित ठिकाणी सुरु करावीत अशी मागणी जिल्हा सरचिटणीस तथा बीड शहर प्रभारी अनिल घुमरे यांच्याकडून करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले कि, शिवसंग्राम बीडकरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असून अशा समस्यांवेळी बीडकरांनी हाक द्यावी शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांच्या सूचनेनुसार आम्ही मदतीसाठी कटिबद्ध आहोत.No comments