Breaking News

नराधमाच्या वासनेची चिमुकली शिकार

शिरूर तालुक्यातील नात्याला काळिमा फासणाऱ्या धक्कादायक घटनेने संताप 

शिरूर, कासार : वासनेनं बेधुंद झालेल्या एका हैवानाने चिमुकलीच्या कोवळ्या शरीराचे लचके तोडले. बापा समान पण नात्यानं चुलत चुलता असलेल्या नराधमाची नजर तिच्यावर पडली आणि त्यानं वासनेची शिकार आपली पुतणी बनवली. नात्याला काळिमा फासणारी ही संतापजनक घटना शिरूर कासार तालुक्यातील एका गावात घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका गावातील 13 वर्षीय मुलगी किराणा दुकानावर सामान आणण्यासाठी रविवारी निघाली होती. दरम्यान तिला नात्यानं चुलत चुलता असलेल्या नराधमाने रस्त्यात अडवून तुला तुझ्या  आजी-आजोबांनी  बोलावल्याची बतावणी मारून त्या चिमुकलीला  गावा नजीक असलेल्या डोंगरावर जे निर्जंस्थळी आहे , त्याठिकाणी तिला नेले. तिथं कोणीच नसल्याचे पाहून ती चिमुकली भयभीत झाली आणि मोठं मोठ्याने ओरडू लागली. मात्र वासनेनं बेधुंद झालेल्या त्या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून शिरूर, कासार पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तपास पोलीस उप निरिक्षक मनोज बरूरे करीत आहेत.  घटनेनंतर नराधम  आरोपी मात्र फरार झाला आहे.

No comments