Breaking News

गृहनिर्माण खात्याच्या शासन आदेशानुसार वडवणी शहरातील घरकुल लाभार्थ्यांना पूर्ण निधी वाटप करावा: - शेषेराव जगताप

आ.सुरेश धस यांच्या कौशल्याने घरकुल निधीचे भिजत घोंगडे निकाली निघणार

जगदीश गोरे । वडवणी

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वडवणी शहरातील ज्या घरकुल लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम ज्या टप्प्यापर्यंत पूर्ण केलेले आहे अशांना त्या सर्व बांधकाम पूर्ण केल्याचा थकित निधी मिळण्याचा मार्ग लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तृत्ववान आमदार आ.सुरेश धस यांच्या कौशल्याने आता सुकर झाला असून गृहनिर्माण खात्याच्या शासन आदेशानुसार सदरील घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाची पूर्ण रक्कम देण्याचे आदेशित केल्याने तसेच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याही ही बाब निदर्शनास आल्याने आता घरकुल निधीचे भिजत घोंगडे निश्चितपणे निकाली निघणार आहे. तरी वडवणी शहरातील घरकुल लाभार्थ्यांना त्यांनी बांधकाम पूर्ण केलेल्या टप्प्यापर्यंतचा पूर्ण निधी त्यांना तातडीने वाटप करावा अशी मागणी वडवणीचे कार्यतत्पर नगरसेवक शेषेराव जगताप यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. 

                याबाबत अधिक माहिती अशी की, काल सोमवार दिनांक ७ सप्टेंबर २०२० रोजी वडवणी शहरातील प्रभाग क्रमांक ४ चे कार्यतत्पर युवा नगरसेवक शेषेराव अभिमन्यू जगताप यांनी मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वडवणी शहरातील मंजूर घरकुलांच्या पैकी ज्या घरकुलांचे ज्या टप्प्यात काम पूर्ण झाले आहे त्यांना त्यांच्या पूर्ण निधीचे वाटप करण्यात यावे. राज्य सरकारने मंजूर घरकुलांसाठी प्रत्येकी ४० हजार रुपयांचा पहिला हप्ता नगरपंचायतकडे जमा केलेला आहे. परंतु मंजूर घरकुलांपैकी सर्वच्या सर्व घरकुल बांधकाम अद्याप सुरू झालेले नाहीत. वेगवेगळ्या गोष्टींमुळे मंजूर घरकुलांचे पैकी केवळ २५ ते ५० टक्के घरकुलांचे बांधकाम विविध टप्प्यांवर येऊन पूर्ण होत आहे. त्यामुळे नगरपंचायतकडे कोट्यावधी रुपयांचा निधी शिल्लक आहे. या निधीतून पहिला हप्ता ४० हजार रुपये व दुसरा हप्ता ६० हजार रुपये नगरपंचायतीने लाभार्थ्यांना वाटप केलेला आहे. परंतु ज्या लाभार्थ्यांचे बांधकाम त्यापेक्षा जास्त किंवा पूर्ण झालेले आहे अशांना दिनांक ८ फेब्रुवारी २०१९ च्या गृहनिर्माण खात्याच्या शासन आदेशानुसार ज्या टप्प्यापर्यंत बांधकाम पूर्ण झालेले आहे अशांना २ ते २.५० लाख रुपये पर्यंत देता येतील अशी बाब जिल्हाधिकारी बीड यांच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे दबंग आमदार आ.सुरेश आण्णा धस यांनी सोशल मीडियाव्दारे सांगितले असून सर्व मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी त्या दिनांक ८ फेब्रुवारी २०१९ च्या शासन आदेशाचे अवलोकन करून त्याअन्वये सर्व पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर पुढील निधी वाटप करण्याचे आवाहनही आ.सुरेश धस यांनी केले आहे. तसेच शासनाकडून आलेला निधी विविध बँकांमध्ये ठेवून त्यावर व्याज मिळवण्याचा जो प्रकार नगरपंचायतकडून चालू आहे तो तात्काळ बंद करण्यात यावा व गरजू लाभार्थ्यांना नियमानुसार पूर्ण थकित निधी देण्यात यावा अशीही मागणी वडवणी शहरातील प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक शेषराव जगताप यांनी मुख्याधिकारी नगरपंचायत वडवणी यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे केली आहे. दरम्यान ज्या घरकुल लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम ज्या-ज्या टप्प्यापर्यंत पूर्ण केलेले आहे अशांना त्या सर्व बांधकाम पूर्ण केल्याचा थकित निधी मिळण्याचा मार्ग लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे दबंग आमदार आ.सुरेश धस यांच्या कौशल्याने आता सुकर झाला असून गृहनिर्माण खात्याच्या शासन आदेशानुसार सदरील घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाची पूर्ण थकित रक्कम देण्याचे आदेशित केल्याने तसेच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याही ही बाब निदर्शनास आल्याने आता घरकुल निधीचे भिजत घोंगडे निश्चितपणे निकाली निघणार असल्याने घरकुल लाभार्थ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments