Breaking News

गावठी कट्टा बाळगणार्‍या तरुणाला पोलिसांनी केलं जेरबंद

बीड : चौसाळा परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरणार्‍या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय विजय गोसावी यांनी जेरबंद करून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


   प्रदीप रामहरी जोगदंड (रा. चौसाळा) हा चौसाळा परिसरात गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय विजय गोसावी यांना मिळाल्यावरून त्यांनी तात्काळ सदरील माथेफिरूला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह मॅगझीन ताब्यात घेऊन नेकनूर पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गोसावी, हवालदार उबाळे, नवले, वंजारे यांनी केली. 

No comments