Breaking News

पैलवानाच्या तालीम खुल्या करा - पै.माऊली पानसंबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

बाळकृष्ण मंगरूळकर । शिरूर कासार

ज्या खेळावर पहिलवाणांचे भविष्य आहे व त्यासाठी पहिलवानांना सतत सराव करावा लागतो मात्र सध्या "कोरोना" मुळे तालीमीचे दरवाजे बंद असल्याने पहिलवानाना सराव करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
तालीम सुरू करून पहिलवानांना न्याय द्यावा असी मागणी पै.माऊली पानसंबळ यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी बीड यांचेकडे केली आहे.

शुक्रवारी बीडचे जिल्हाधिकारी हे शिरूर दौऱ्यावर आले असताना माऊली पानसंबळ यांनी त्यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात आता लवकरच कुस्त्याच्या स्पर्धा सुरू होतील या स्पर्धा जिंकण्यासाठी सराव अती गरजेचा असुन या खेळावरच पहिलवानांचे भविष्य निर्भर असते म्हणून तालीम सुरू कराव्यात व त्यांना राज्य शासनाने अनुदान देखील द्यावे अशा स्वरूपाची मागणी पै.पानसंबळ यांनी केली आहे.

No comments