Breaking News

प्लॉट परत देण्यासाठी शोले स्टाईलने तरुण चढला मंदिराच्या कळसावर

वडिलांनी विकलेला प्लॉट परत ताब्यात देण्याच्या मागणीसाठी तरुणांचा मंदिराच्या कळसावर चढून आत्महत्येचा प्रयत्न

गौतम बचुटे । केज 
वडिलांनी परस्पर विलेला प्लॉट परत देण्याच्या मागणीसाठी केज तालुक्यातील साळेगाव येथील एक तरुण हनुमान मंदिरावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु  तहसीलदार पोलीस अधिकारी आणि सरपंच यांच्या मध्यस्तीने त्याची समजूत काढून त्यास खाली उतरले.

या बाबतची माहिती अशी की, दि. २८ सप्टेंबर सोमवार रोजी साळेगाव ता केज येथील प्रदीप दत्तू येळवे हा तरुण त्याचे वडील दत्तू येळवे यांनी विष्णू इंगळे यांना प्लॉट विकला होता. परंतु प्रदीप इंगळे याचा त्यास विरोध होता. सदर प्लॉट हा परत मिळावा या मागणीसाठी प्रदीप येळवे हा गावातील पन्नास फूट उंचीवर असलेल्या हनुमान मंदिराच्या कळसावर चढून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी देत होता. याची माहिती तहसीलदार मेंढके व पोलीस प्रशासनाला मिळताच तहसीलदार मेंढके, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे व सरपंच कैलास जाधव चा प्रयत्न केला. याची अधिकाऱ्यांनी त्याची समजूत काढून सदर प्लॉट परत देण्याचे सर्वांसमक्ष आश्वासन दिले. त्याची समजूत काढली आणि त्यास खाली उतरण्याची विनंती केली. त्या नंतर प्रदीप येळवे हा खाली उतरला. या वेळी तहसीलदार मेंढके साहेब, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, तलाठी इनामदार, सरपंच कैलास जाधव, माजी सरपंच नारायण लांडगे, पत्रकार गौतम बचुटे, पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड, हनुमंत चादर, जिवन करवंदे, अशोक नामदास, मतीन शेख यांनी मध्यस्ती केली. पुढील अनर्थ टाळता यावा म्हणून प्रशासनाच्या वतीने अग्निशामक दल व आपत्ती विभागाचे स्वयंसेवकही तयारीत होते.No comments