Breaking News

पैठण ते पंढरपूर (पालखी मार्ग) भूसंपादनाबाबत आवाहन            बीड :  शिरुर कासार तालुका व पाटोदा तालुका अंतर्गत सर्व जनतेस आवाहन करण्यात आले असून राष्ट्रीय महामार्ग क्र.752 / ई पैठण ते पंढरपुर (पालखी मार्ग) अंतर्गत शिरुर का. तालुक्यातील 9 गावे व पाटोदा तालुक्यातील 7 गावातील जमिन संपादीत होत असुन त्या करीता उपजिल्हाधिकारी भुसं.ल.पा.बीड हे सक्षम प्रधिकारी (CALA) आहेत व कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद यांचे अधिनस्त सदर राष्ट्रीय महामार्ग आहे.

            सदर राष्ट्रीय महामार्ग 752/ई करीता शासन निर्णय दि.12.05.2015, 30.09.2015 व 25.01.2015 नुसार थेट खरेदीने भुसंपादन प्रक्रिया ही संपादीत संघ म्हणून कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद यांच्या अंतर्गत व अधिनस्त आहे.
            सदर राष्ट्रीय महामार्ग क्र.752/ई या प्रकल्पा करिता ज्यांची जमिन संपादीत करण्यात येत आहे. त्यांनी इतर कोणत्याही खाजगी व्यक्तीच्या भुलथापाला बळी न पडता त्यांना कुठल्याही प्रकाराचे कोरे चेक देण्यात येऊ नये. तसेच सदर प्रकरणात शासन निर्णय दि. 12.05.2015, 30.09.2015 व 25.01.2015 नुसार थेट खरेदीने भुसंपादन प्रक्रिया पार पाडण्यात येत असल्याने बॉन्ड बाबतची कार्यवाही कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद यांचे अधिनस्त आहे.
            या करीता कोणीही खाजगी व्यक्ती यांच्याशी संपर्क न करता काही अडचण किंवा तक्रार असल्यास कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद व (CALA) म्हणजेच उपजिल्हाधिकारी भुसं.ल.पा.बीड यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.

No comments