Breaking News

हनुमंत पिंपरीत सोयाबीन काढणी शेतीशाळा संपन्न


गौतम बचुटे । केज  

शेतकऱ्यांना सोयाबीनची कापणी, काढणी व मळणी या कृषी विभाग आणि आत्मा यांच्याबवतीने मार्गदर्शन करण्यासाठी शेतीशाळा संपन्न झाली.

या बाबतची माहिती अशी की, सध्या सोयाबीन पिकाची काढणी सुरु आहे. त्या बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभाग आणि आत्मा यांच्या द्वारे हनुमंत पिंप्री ता. केज येथे दि.३९ सप्टेंबर रोजी पीक कापणी शेतीशाळा आयोजित केली होती. यात शेतकरी, शेतमजूर यांनी सोयाबीन काढणी करताना घ्यावयाची काळजी. ऑफ टाईपची झाडे वेगळी करणे. दलदलीच्या ठिकाणी असलेले सोयाबीन काढताना त्याला माती चिटकून नये म्हणून काळजी घेणे. मळणी करताना आर्द्रता पाहून थ्रेशर मशीनची स्पीड ३०० ते ४०० आरपीएम ठेवणे. पुढील हंगामाकरिता सोयाबीन बियाणे घरी साठवून ठेवताना सुतळी बारदाना वापर करणे. आदी संदर्भात विस्तृतपणे मार्गदर्शन करण्यात आले. या संपन्न झालेल्या शेती शाळेला कृषी सहाय्यक नितीन पाटील, समूह सहायक कमलाकर राऊत, शेतीशाळा समन्वयक शिवप्रसाद येळकर यांज उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. No comments