कोरोनामुळे युसूफवडगावमध्ये कोव्हीड योद्धा पोलिसचा मृत्यू
गौतम बचुटे । केज
ताळुक्यातील युसुफ वडगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र वाघमारे वय ५४ वर्ष यांचा आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी दुपारी २:०० वाजता कोरोना विषाणू विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू होते.
त्यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्व त्यांचे पोलीस कर्मचारी आणि नागरिकात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान पोलिस स्टेशनचे आणखीन चार पोलिस कर्मचारी कोरोना बाधित असून त्यांच्यावर लोखंडी सावरगाव येथील कोरना उपचार केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती मिळते.
No comments