Breaking News

खुंटेफळ गावातील नुकसान ग्रस्त कुटूंबांना धनादेश वाटप

आ. बाळासाहेब आजबे यांनी दिलेला शब्द पळाला

आष्टी : बोले तैसा चाले या वृत्ती प्रमाणे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनी आष्टी तालुक्यातील 
खुंटेफळ गावात तीन महिन्यांपूर्वी वादळी वाऱ्यात पडझड झालेल्या नुकसान ग्रस्त कुटूंबांना दिलेला शब्द पाळला आहे. शासनदरबारी पाठपुरावा करून शुक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी संबंधित तीस कुटूंबांना त्यांच्या गावात जाऊन आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले आहेत.
             जून 2020 मध्ये आष्टी तालुक्यातील खुंटेफळ गावात जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक घराची पडझड झाली होती. यामध्ये जवळपास तीस घरांचे पत्रे उडून गेले व भिंती ही पडल्या होत्या. सदरील घटनेत नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. घटना घडल्या दिवशी मतदार संघाचे कार्यतत्पर आमदार बाळासाहेब आजबे यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित कुटूंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचा शब्द दिला होता. तसेच झालेल्या नुकसानाचे पंचनामे तात्काळ करून घेण्याचे आदेश ही अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. दिलेल्या शब्दाला जगणारणा माणूस म्हणून ओळख असलेल्या आ. बाळासाहेब आजबे यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून अवघ्या तीन महिन्यातच नुकसान ग्रस्तांना आर्थिक मदतीचा धनादेश गावात जाऊन त्यांच्या हातात सुपूर्द केला आहे. शुक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी युवा नेते महेश आजबे व यश आजबे यांच्या हस्ते तीस नुकसान ग्रस्त कुटूंबांना धनादेश वाटप करण्यात आले आहे. यावेळी संबंधित कुटूंबांनी आ. बाळासाहेब आजबे यांचे आभार मानले. 
           या कार्यक्रमासाठी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक साहेबराव दादा थोरवे, लोणी जि.प. गट प्रमुख सुभाष वाळके, बाबासाहेब भिटे, दत्ता काकडे, राजू काकडे, भाऊसाहेब घुले, अर्जुन काकडे, राजेंद्र जारांगे यांच्यासह संबंधित लाभार्थी व गावकरी उपस्थित होते.

1 comment: