Breaking News

दशरथ दळवी यांचे निधन

आष्टी : येथील प्रसिद्ध आचारी तथा भेळ विक्रेते दशरथ माणिक दळवी यांचे आज (ता. सात) दुपारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 60 वर्षे होते. शांत व संयमी स्वभावाने ते शहरात अप्पा नावाने परिचित होते. सोमवारी सायंकाळी येथील खंडोबा मंदिरा जवळील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना-नातवंडे असा परिवार आहे. पञकार गणेश दळवी यांचे वडील होत.

No comments