Breaking News

महिला ग्रामस्थांचे गावातच उपोषण

सरकारी जागेवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची होतेय मागणी

आष्टी : सरकारी जागेवरील स.नं. १०५ मधील संपूर्ण अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात यावी या मागणीसाठी आष्टी तालुक्यातील हिंगणी ग्रामस्थांच्या वतीने गावातील जि.प.शाळेसमोरील प्रांगणात वाद्यांसह आंदोलनाला सुरुवात केली आहे. 

यावेळी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,मौजे हिंगणी येथील सर्व्हे नं. १०५ क्षेत्र हे.आर असून, त्यामध्ये दक्षिणेकडुन अशोक कुंडलीक झांबरे, महादेव कुंडलीक झांबरे, व इतर जणांनी सिमेंट काँक्रीटचे बांधकाम करुन सरकारी जागेवर अतिक्रमण करत जमिन गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला आहे.सदरील जागेवरील अतिक्रमण हे नाहक अडचणीचे ठरत आहे.शिवाय संबंधित ग्रामपंचायत हि राजकीय आकसापोटी बड्या लोकांच्या अतिक्रमणाकडे सपशेल डोळेझाक करत गोरगरीबांची अतिक्रमणे पाडण्यासाठी आग्रही असल्याचे चिञ असून अशावेळी स.न.105 मधील सरकारी जागेवरील सर्वच्या सर्वच अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात यावीत अशी मागणी करत उपोषणार्थींनी वाद्यासह उपोषणास सुरूवात केली आहे. उपोषणार्थी मध्ये सुरेखा प्रल्हाद झांबरे, सुमलबाई शामराव झांबरे,पमाबाई बाळासाहेब झांबरे, शांताबाई चंद्रकांत झांबरे, शोभाबाई शशीकांत झांबरे एकनाथ झांबरे आदींचा समावेश आहे.

No comments