Breaking News

पहा... खांद्यावर गदा घेऊन मललांनी का ठोकलाय शड्डू !राज्यभरातील पहिलवान आखाड्यासाठी झाले आक्रमक!  

शिरूर का. पैहिलवान माऊली पानसंबळ करतोय राज्याचं नेतृत्व; राज्यभरातील पहिलवानांचा मिळतोय पाठिंबा!

बाळकृष्ण मंगरूळकर । शिरूर का.

जगाला वेठीस धरलेल्या "कोरोना " महामारीची सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. यातून आखाड्यातील लाल माती ही सुटली नाही.  लॉकडाऊन देशभरातील
मंदिर मशीद बरोबर  पहिलवानांच्या तालमीला टाळे लागले आहे.  शासनाने आता कांही अंशी शिथिलता देत दुकानाबरोबर कांही व्यवसाय सुरू केलेत. मात्र मंदिराबरोबर पहिलवानांच्या तालमी सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही ,पहिलवानांचे भविष्य घडवणा-या तालमी सुरू कराव्यात या मागणीसाठी आता राज्यभरातील पहिलवानानी मानाची गदा खांद्यावर घेत एल्गार पुकारला आहे.  याचं  नेतृत्व शिरूर कासार येथील पैहिलवान माऊली पानसंबळ करतोय.  राज्यभरातील अनुभवी तसेच नवशिक्या पहिलवानांचा त्याच्या एल्गारला पाठिंबा मिळताना दिसतोय.  

कोरोना महामारी मुळे सरावासाठी असलेल्या तालमी बंद झाल्या असून परिणामी सरावच नसल्याने स्पर्धा जिंकायच्या कशा असा प्रश्न निर्माण झाला आहे.  पैहिलवान पानसंबळ यांच्या आंदोलनाला बीड जिल्ह्यासह अहमदनगर, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, श्रीगोंदा, बारामती, सांगली, सातारा, सांगोला,  सोलापुर येथील मल्ल पाठींबा देत असल्याचे पानसंबळ म्हणतायेत.

काय आहेत त्यांच्या मागण्या पाहू यात.... 

1 comment: