Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारदा प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा यावर्षी रद्द - अमरसिंह पंडित


बारा वर्षांत पहिल्यांदाचा शिक्षक पुरस्कार वितरणाची परंपरा खंडीत


गेवराई :  गेवराई विधानसभा मतदार संघातील गुणी गुरुजनांचा गौरव होवून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने शारदा प्रतिष्ठानकडून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या  शिक्षकांना दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्याचे काम मागील बारा वर्षांपासून अविरत सुरु आहे, मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन हा पुरस्कार वितरण सोहळा रद्द करत असल्याची माहिती शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी दिली आहे. शारदा प्रतिष्ठानच्या वतीने सातत्य राखून घेण्यात येणारा २२ वा सामुहिक विवाह सोहळा आणि  १३ वा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा या वर्षी कोरोनामुळे रद्द करावा लागल्याचे ते म्हणाले. प्रतिष्ठाणची ही परंपरा पहिल्यांदाच खंडीत झाली आहे.सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या गेवराई येथील शारदा प्रतिष्ठानच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या  शिक्षकांना मागील बारा वर्षांपासून दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्याचे काम प्रतिष्ठानचे कार्यवाह माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. याभव्य कार्यक्रमाला राज्यातील अनेक नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली आहे. शैक्षणिक क्षेत्रात भरीव आणि उल्लेखनीय काम करणा-या शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे, समाजाने या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचा सन्मान करावा या उद्देशाने शारदा प्रतिष्ठानने आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार वितरण  सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठान चे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी दिली. संपूर्ण जग कोरोनामुळे त्रस्त झाले असताना आपण सोशल डिस्टन्सिंग बरोबरच आपले सरकार आणि आपल्या स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचना आणि मार्गदर्शनाचे पालन करण्याची आपली जबाबदारी आहे, त्यामुळे यावर्षी हा सोहळा आपण रद्द करत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

No comments