Breaking News

केज तालुक्यात एकाच दिवशी दोन महिलांचा विनयभंगाच्या घटना

गौतम बचुटे । केज 
केज तालुक्यात एकाच दिवशी महिलांच्या विनयभंगाच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून या घटनेतील एका आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ६:३० वा. केज तालुक्यातील दरडवाडी येथे शेतात शौचास जाणाऱ्या एका २२ वर्षीय विवाहित महिलेच्या हाताला धरून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार केज पोलीस स्टेशनला गु.र.नं. ३४५/२०२० भा.दं.वि. ३५४, ३५४(अ), ३५४(ड), ३२३ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी तात्काळ आरोपीस अटक केली आहे. तर या प्रकरणाचा जाब विचारला असता पीडितेला लाथाबुक्यांनी मारहाण केली म्हणून मुख्य आरोपी व त्याचे सोबत त्याचे आई वडील यांच्यावरही गुन्हा नोंद झाला आहे. याचा अधिक तपास पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे करीत आहेत. 

तर अन्य दुसऱ्या घटनेत केज तालुक्यातील शिंदी येथे दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ७:०० वा. घरा समोर बांधीलेल्या शेळ्या सोडीत असलेल्या १९ वर्षीय विवाहितेचा रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. तरुणीच्या फिर्यादी नुसार केज पोलीस स्टेशनला गु.र.नं. ३४७/२०२० भा.दं.वि. ३५४, ३५४(अ), ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८ आणि १४९ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच घटनेचा जाब विचारायला गेले असता उलटपक्षी  फिर्यादी आणि त्याचे नातेवाईक यांनी पीडितेला लाथा बुक्यांनी व दगडांनी मारहाण केल्या प्रकरणी आरोपीचे आई-वडील, भाऊ आणि इतर असे एकूण सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण मुंडे हे करीत आहेत.
तपासी अधिकारी

1 comment:

  1. अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे.

    ReplyDelete