Breaking News

ग्रामपंचायतीच्या विरोधात सदस्यांनी केले भिक मांगो आंदोलनगावात फवारणी करण्यासाठी पहाडी पारगावच्या सदस्यांचं अनोखं आंदोलन 

जगदीश गोरे । किल्ले धारूर 


धारूर तालुक्यातील पहाडी पारगाव,थेटेगव्हण,ढगेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामपंचायतीच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी व स्वच्छतेसाठी  भिक मांगो आंदोलन करुन जो निधी जमा झाला त्या निधीतून गावात फवारणी केली आहे.

           

सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असुन आता शहारातुन ग्रामीण भागात शिरकाव केला आहे तर पहाडी पारगाव येथेही रुग्ण आढळले असल्याने व गावात घाणीचे साम्राज्य पसरले गावात गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे म्हणून भिक मांगो आंदोलन करून गाव फवारणी केली आहे तरी 7900 रूपये जमा झाले आहेत.

निधी उपलब्ध नसणारी ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली असून ग्रामसेवक गावकऱ्यांना व ग्रामपंचायत सदस्यांना निधी नाही म्हणून आसे सांगतात त्यामुळे गावातील गोरगरीब जनता ग्रामपंचायतला भीक म्हणून निधी जमा करून देत आहे भीक मागून गावाचा विकास व गावात स्वचछता राबविणारी ही एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे. गावामध्ये कोणत्याच प्रकारचे सुविधा उपलब्ध नाहीत विकास झालेला नाही आता ग्रामपंचायतला भिक मागायची वेळ आली आहे.यावेळी विलास मुंडे,गोरख पुर्णे,राजेभाऊ अंडील,सुग्रीव वरकले, नवनाथ इरमले,आसाराम मुंडे,मच्छींद्र पुर्णे, परमेश्वर पाटोळे,बाळराजे अंडील,बंडु मुंडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments