Breaking News

शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वाटप करा : जिल्हा परिषद सदस्य रामदास बडे यांची मागणी

शिरूर का. :  तालुक्यातील पिंपळनेर जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास बँक टाळाटाळ करत असून शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज वाटप करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य रामदास बडे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात श्री. बडे यांनी म्हटले आहे, की 
तालुक्यातील पिंपळनेर जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये भारतीय स्टेट बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या दोन शाखा आहेत. मात्र या दोन्ही शाखेतील अधिकारी- कर्मचारी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. शिवाय शेतकऱ्यांशी सुसंवाद न साधता त्यांना कसल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. त्यामुळे बँक प्रशासनाच्या या तुघलकी वागण्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. 
शेतकऱ्यांना पीक कर्ज तत्काळ देण्यात यावे अन्यथा मंगळवारी (दि.१५) दोन्ही बँकेच्या दारात घंटानाद आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे जिल्हा परिषद 

No comments