Breaking News

पुरूष हक्क संरक्षण समितीच्या तालुकाध्यक्षपदी शरद रेडेकरआष्टी :  येथील पञकार शरद रेडेकर यांची पुरूष हक्क संरक्षण समितीच्या आष्टी  तालुका अध्यक्ष पदी निवड झाली आहे. 

     महिलांवरील अन्याला वाचा फोडण्यासाठी विविध संघटना कार्यरत आहेत. महिलांवर होणारे कौटुंबिक अन्यायावर या संघटना महिलांबरोबर  असतात. माञ पुरूषांवर देखील कौटुंबिक अन्याय होतात या अन्याला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रात पुरूष हक्क संरक्षण समिती काम करते. पिडीत पुरूषांचे समोदशन करून त्यांना न्यायालयीन लढ्यासाठी हि संघटना काम करते. या संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. नामदेव नाथा साबळे यांनी पञकार शरद रेडेकर यांना नुकतेच नियुक्ती पञ देऊन निवड झाल्याचे कळवले आहे. या निवडीबद्दल  त्यांचे आष्टी तालुका पञकार संघ, समिती चे अध्यक्ष  डाॅ. सुनिल घाडगे, सचिव  अॅड. धर्मेंद्र चव्हाण, अहमदनगर जिल्हाध्यक्ष अॅड. शिवाजी आण्णा कराळे, बीड जिल्हा ध्यक्ष अॅड.  नामदेव नाथा साबळे व  मिञ परिवाराने अभिनंदन केले आहे. व पुढिल कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


No comments