Breaking News

पोलिसांबाबत अपशब्द काढणारी कंगना मुंबईत आली तर थोबाड फोडणार -अ‍ॅड. संगिता चव्हाण


बीड : महाराष्ट्राच्या पावन भूमीत बाहेरुन आलेल्या आणि कलेच्या नावावर नंगानाच करत करोडो रुपये कमवणार्‍या कचकडीच्या बाहुल्यांनी मुंबई सारख्या लाखो लोकांचे जीवनमान उंचावणार्‍या पोलीसांबाबद अपशब्द काढून बुध्दीभ्रष्ट झाल्याचे अभिनेत्री कंगना राणावत हिने सिध्द केले असून कंगना मुंबईत आली तर रणरागिणी घेवून तिचे थोबाड फोडणार असा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगिताताई चव्हाण यांनी दिला आहे. हह

ज्या मुंबईने हुतात्मे दिले. त्या मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल कोणीही उठून काहीही बोलू शकत नाही. आम्ही ते खपवून घेणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. पोकळ धमक्या देत नाही. थेट कृती करतो, मुंबई बाबत काहीही बरळणार्‍या अशा मेंटल केसेस आरोग्य खात्याने हाताळाव्यात. मुंबई पोलिसांनी त्याबाबत कठोर पावलं उचलावीत. अशा पागल लोकांना जे पक्ष पाठिंबा देत आहेत त्यांच्या विचाराची किव येते. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणार्‍या कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावी. तसचे मुंबई व मुंबई  पोलीसांबाबत अपशब्द काढणार्‍या कंगनाने मुंबई पाऊल ठेवले तर शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणी घेवून तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही अशा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगिताताई चव्हाण यांनी दिला आहे.

1 comment:

  1. Deshatil mual samshya varun laksh hatvinyache kam chlu aahe

    ReplyDelete