Breaking News

गायरान जमिनी लाटण्याचा डाव : संघर्ष समितीचे तहसीलदारांना निवेदन


महादेव मुजमुले । वडवणी
गायरान जमीन गेल्या अनेक वर्षापासून पुसरा (ता. वडवणी) येथील गरीब गायरानधारक वहती करीत आहेत. मात्र त्यांच्या गायरान जमिनीवर धनदांडग्याचा डोळा असून त्यातच शासकीय प्रयोजनासाठी प्रशासनाने परिसरातील गायरान जमीन अधिग्रहण करण्याचा डाव आखला आहे. मात्र प्रशासनाने गायरान जमिनीचे अधिग्रहण केल्यास गायरणधारकांवर  उपासमारीची वेळ येईल. त्यामुळं प्रशासनाने तशी कोणतीही कारवाई करू नये. अशी मागणी निवेदनाद्वारे गायरान बचाव संघर्ष समितीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की तालुक्यातील पुसरा गावच्या शिवारातील सुमारे दोनशे ते तीनशे कुटूंबे गायरान जमीन कसत असून त्यावर आपल्या कुटूंबाची गुजराण करतायेत.  पंरतु योजेनेच्या नावाखाली प्रशासकीय व अधिकारी राजकीय नेते  मात्र जाणीव पुर्वक गायरान जमिनी लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप समितीने केला आहे.  त्यातच शासकीय प्रयोजना करिता गायरान जमीन प्रशासन अधीग्रहण करण्याच्या तयारीत असून तसे झाल्यास त्या कुटूंबांवर उपासमारीची वेळ येईल. म्हणून त्याठिकाणी कुठलेही शासकीय काम करण्यात येऊ नये, अशी मागणी गायरान बचाव संघर्ष समितीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली असून शासनाने जर गायरान जमिनीचे अधिग्रहण केल्यास समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गायरान बचाव संघर्ष समितीचे सरपंच हरिभाऊ पवार, सतीश मुजमुले, विष्णुबाळ झोडगे, अविनाश मुजमुले, समाधान झेडगे,  विष्णु मुजमुले यांनी दिला आहे.

1 comment: