Breaking News

महिलेचं केलं अपहरण, एक जणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या


गौतम बचुटे । केज  
अनैतिक संबंधातुन महिलेचे जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण केले असून गुन्हा दाखल होताच एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील चिंचपूर येथील ऊस तोड मुकादम सिताराम दैवान लांब यांचे मागील चार वर्षां पासून केज येथील एका ऊस तोड मजूर महिले सोबत अनैतिक संबंध होते. ती त्याच्या सोबत ऊस तोडणीच्या कामावर जात होती. मागील वर्षी दि. ११ सप्टेंबर २०१९ रोजी ती मुकादमा सोबत कामाला जाते म्हणून गेली परंतु ऊस तोडणीचा हंगाम संपला तरी ती परत आली नाही; म्हणून त्या महिलेची बहीण व नातेवाईक यांनी विचारणा करूनही मुकादम सिताराम लांब याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणी पीडित बेपत्ता महिलेच्या बहिणीच्या फिर्यादी वरून दि.७ सप्टेंबर रोजी रात्री सिताराम दैवान लांब व त्याचा वडील दैवान लांब यांच्या विरोधात गु.र नं. ३५७/२०२० भा.दं.वि. ३६४, ३४ या सह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३ (२) (५) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी यातील मुख्य संशयीत सिताराम दैवान लांब यास ताब्यात घेतले असून या प्रकरणी संशयित आरोपी सिताराम लांब यास न्यायालयाने दि.१४ सप्टेंबर पर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर या करीत आहेत

No comments