Breaking News

बहुजन समाजातील तरुणांनी "व्यसनाने नाही तर व्यवसायाने" आपली प्रगती साधावी- किशन तांगडे

प्राजक्ता मल्टिसर्विसेसचे थाटात उद्घघाटन

बीड : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असल्या कारणाने बहुजन- वंचित समाजातील तरुणांनी जाणीवपूर्वक स्वतः पुढाकार घेऊन "व्यसनाने नाही तर व्यवसायाने" आपली प्रगती साधावी,जेणे करुन आपला आपल्या कुटूंबाचा आणि  समाजाच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल असे प्रतिपादन रिपाईचे तालुका अध्यक्ष किशन तांगडे यांनी केले.

केसापुरी परभणी येथे प्राजक्ता मल्टिसर्विसेसचे  उदघाटन रिपाइंचे किशन तांगडे यांच्या हस्ते बुधवारी (दि.९) करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. 

परभणी (के.) येथील होतकरू तरुण आकाश तांगडे आणि सुशील तांगडे यांच्या पुढाकाराने सदरील मल्टिसर्वेसेस सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमा प्रसंगी किशन तांगडे यांच्या सुविद्य पत्नी सौ.सविता तांगडे यांच्या सह गावातील अनिल तांगडे, रोहीत गायकवाड, आकाश तांगडे, विजय तांगडे, निखिल तांगडे, शुभम काळे, अनिल काळे, रोहन काळे, कुलदीप काळे, राहुल गायकवाड, मुजीब शेख, अरबाज सय्यद, विकास काळे, अमोल तांगडे, निजामुद्दीन शेख, महमद शेख, येसूबाई तांगडे, अर्चना तांगडे, विमल तांगडे, संजीवनी तांगडे, छबुबाई गायकवाड, सुदामती गायकवाड, इंदुबाई काळे, मुक्ता काळे, नागराबाई तांगडे, सागरबाई काळे, सुबाबाई काळे, पुष्ममा काळे, आशाबाई काळे, जया काळे, गंगुबाई काळे, शांताबाई काळे, जनाबाई काळे, सुद्राबाई काळे, वालूबाई तांगडे, पारुबाई तांगडे, लक्ष्मी तांगडे, शोभा सू. गायकवाड, संगीता कांबळे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनिल तांगडे यांनी मानले.

1 comment: